कुपवाड : प्रतिनिधी
कृष्णा व्हॅली चेंबर मध्ये शुक्रवारी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या विषयावर कार्यशाळा

महाराष्ट लघु उद्योग विकास महामंडळ, कृष्णा व्हॅली चेंबर आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आलेला आहे.
गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस हे सर्व केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मंत्रालये, विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (पीएसयू) आणि संलग्न संस्थांसाठी वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी सार्वजनिक खरेदी पोर्टल आहे. सार्वजनिक खरेदी प्रक्रिया पारदर्शक, कार्यक्षम आणि समावेशक बनवण्यासाठी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस प्रयत्न करते. सदरची कार्यशाळा ही औद्योगिक वसाहतीमधील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगासाठी आहे. सदरची कार्यशाळा मोफत आहे.
सदर कार्यशाळेमध्ये गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेसची ओळख, नोंदणी कशी करायची, आपले प्रोफाइल कसे तयार करायचे, आपल्या उद्योगाचा ब्रोशर कसा अपडेट करायचा गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेसवर अपलोड केलेल्या इनव्हॉइसवर आधारित वित्तपुरवठा तसेच व्यवसायाच्या संधींचा प्रभावी शोध या विषयावर विस्तृतपणे सखोल माहिती तज्ञ अधिकारी यांच्याकडून दिली जाणार आहे. कार्यशाळेसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
या लिंकवर रजिस्ट्रेशन करावे.
https://forms.gle/fJY5jsu6oTJ6adpf8
तरी या कार्यशाळेचा जास्तीत जास्त उद्योजकांनी फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सतीश मालू यांनी केले आहे.