बामणोली | प्रतिनिधी

बामणोली : ता.११ सांगली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेद्वार सुधीर दादा गाडगीळ यांचा प्रचारार्थ आज बामणोली प्रभाग नं १ मध्ये घर टू घर जाऊन आपले बहुमोल मत सुधीर दादा यांना द्यावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी प्रभाग नं १ मध्ये आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी २०१४ ते २०२४ या १० वर्षांत केलेल्या विकासकामांचे कौतुक करत येणाऱ्या निवडणुकीत सुधीर दादा गाडगीळ यांना भरघोस मतांनी निवडून देण्याची ग्वाही दिली.
आपल्या प्रभागातील उर्वरित कामे आमदार सुधीर दादा गाडगीळ, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, भाजपा सांगली शहर जिल्हाअध्यक्ष प्रकाश मामा ढंग, पॅनेल प्रमुख सुभाष अण्णा चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या वर्षभरात मार्गी लावण्याचे ग्वाही या वेळी आम्ही दिली.
यावेळी बामणोली सरपंच गीताताई चिंचकर, भाजप नेते सुभाष चिंचकर, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजेश संनोळी, उपसरपंच मा विष्णू लवटे, प्रभाग १ चे ग्रामपंचायत सदस्य संतोष सरगर व संगीता पाटील ,बूथ प्रमुख विवेक कोटोडे, सुमित यमगर, सुनील पाटील, अभिजित घाडगे, दिलीप पाटील, दीपक गायकवाड, शारदा जाधव, संगीता मोहीते आदी मान्यवर उपस्थित होते.