सांगली | प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सांगली शहरात काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदारांना आवाहन पत्र देऊन मतदार यादीतील नाव तपासणे मतदान केंद्राची माहिती करून घेणे. त्याचबरोबर मतदार हेल्पलाइन नंबरबाबतची माहिती दिली.
मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, सावली, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हील चेअर , अत्यावश्यक आरोग्य सुविधाची सोय करण्यात आली असून मतदारांनी, निर्भयपणे येत्या 20 नोव्हेंबरला आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे नागरिकांना केले आवाहन
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी