बामणोली |प्रतिनिधी

सांगली : बामणोली गावात (ता.०९ ) शनिवार २०२४ सांगली विधानसभा महायुती आघाडीचे भाजपा उमेदवार सुधीरदादा गाडगीळ यांच्या प्रचारार्थ गोवा राज्याचे मुख्यमंत्री ना. प्रमोद सावंत हे आज सांगली दौऱ्यावर येणार असून प्रमोद सावंत हे सांगलीतील बामणोली गावची भेट घेऊन बामणोलीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर आणि श्री राम मंदिराचे देवदर्शनासाठी आज दुपारी १ वाजता येणार असल्याचे बामणोली ग्रा. पं. सदस्य व बामणोली गावचे भाजपचे युवा नेते किरण भोसले यांनी
माहिती दिली.
पॅनेल प्रमुख पै सुभाष चिंचकर, बामणोली सरपंच सौ.गीताताई चिंचकर, उपसरपंच विष्णू लवटे, माजी सरपंच व विधमान सदस्य राजेश संनोळी, किरण भोसले, संतोष सरगर, ग्रा.पं. सर्व सदस्य सदस्या यांच्या वतीने बामणोलीतील सर्व नागरिकांना उपस्थितीत राहणाचे विनंती केलेली आहे.