मिरज | प्रतिनिधी

मिरज : सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये शनिवार दि.९/११/२०२४ रोजी मिरजेत शेत जमिनीच्या वादातून भाजपचे स्टार्टअप इंडियाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांच्या मानेवर कुऱ्हाडीने वर्मी घाव घालून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना आज मिरजमध्ये घडली असून याप्रकरणी पाच जणांवर मिरज गांधी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. एक संशयित आरोपीस कार्तिक चांदनवाले याला पोलिसांनी अटक केले आहे.
सुधाकर खाडे यांनी पावणेचार एकर शेत जमीन पंढरपूर रोडवर राम मंदिराजवळ विकसनासाठी घेतली होती. खाडे व कब्जाधारक यांच्यात जमिनीबाबत वाद चालू होता. सुधाकर खाडे त्याचा साथीदारांसोबत शेत जमिनीला कुंपण घालण्यास गेले असता, चंदनवाले व खाडे यांच्यात जोरदार वादावाद सुरू झाली. त्यातून कार्तिक चांदनवाले यांनी खाडेंच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घातल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्वत्र तणावाचे वातावरण झाले.