इचलकरंजी | प्रतिनिधी

इचलकरंजी भारतीय जनता पक्षाला हिंदुराव शेळके यांनी रामराम ठोकला. शेळके अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची घोषणा केली. कोणत्याही परिस्थितीत हिंदुराव शेळके ही विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतीय जनता पार्टीने आवाडे परिवारातील व्यक्तीला विधानसभेची उमेदवारी देण्याचे ठरवल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्यात तिव्र नाराजी पसरली आहे त्यांचे सन्मान जपण्यासाठी निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तमन्ना कोटगी,अतुल शेळके,विकास शेळके,अमोल शेळके यांच्यासह कार्यकर्ते पत्रकार परिषदेत उपस्थित होते.