सांगली | प्रतिनिधी

सांगली स्थानीक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन दुचाकी चोरास केले जेलबंद. त्यांच्या कब्जातील २ ऑक्टिवा एक हिरो पासियन अशा एकूण तीन दुचाकी १ लाख ८० रुपयांच्या जप्त करण्यात आले. गौरव सुंदर भोले वय २१ वर्ष, रा. भारतनगर, माझी सैनिक वसाहत, मिरज, सुशांत सुनील चंदनशिवे वय २६ वर्ष रा. म्हाडा कॉलनी, चिंतामनीनगर, सांगली असे अटक केलेले आरोपीचे नावे आहेत.
पोलीस निरीक्षक सतिश शिदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन मोटार सायकल चोरी करणारे संशयीत इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते. त्या अनुशंगाने दि. १७.१०.२०२४ रोजी गस्त घालत असताना पोलीस हवलादर दारीबा बंडगर यांना गोपनीय बातमीद्वारामार्फत मिळालेल्या माहिती अशी की, गौरव भोले याने त्याचा राहता घरातसमोर चोरीचा दोन दुचाकी लपवून ठेवलेले आहेत. पोलिसांनी सापळा रचून आरोपी गौरवला ताब्यात घेऊन त्याचा जवळील दोन मोपेड दुचाकी जप्त केली. या दोन दुचाकी महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज व मिरज शहर पोलीस ठाणे मिरज या हद्दीतून चोरल्याचे निस्पन्न झाले. पुढील तापसकामी मुद्देमाल सपोनि, पंकज पवार यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात वर्ग केले. अधिक तपास मिरज शहर पोलीस करीत आहे.
तसेच १७/१०-२०२४ पोहवा सतीश माने, अनिल कोळेकर, सागर लवटे, विक्रम खोत हे गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना हवालदार अनिल कोळेकर यांना गोपनीय बातमीद्वारामार्फत मिळलेल्या माहितीने रेकॉर्डवरील गुन्हेगार आरोपी सुशांत चंदनशिवे हा चोरीची दुचाकी घेऊन अहिल्यादेवी होळकर चौकात येणार असल्याने पोलिसांनी सापळा रचून आरोपी सुशांत चंदनशिवेला ताब्यात घेऊन त्याचा कब्जातील दुचाकी जप्त केली. ती दुचाकी विश्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून सांगली सिव्हिल हस्पिटलपासून चोरल्याचे निस्पन्न झाले. पोहवा सतीश माने यांनी जप्त केलेली दुचाकी व आरोपीला विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत.