मिरज | प्रतिनिधी | परशुराम बनसोडे
वड्डी लोकनियुक्त सरपंच कु डॉ यशोधराराजे महेंद्रसिंह शिंदे सरकार यांचे सरपंच पद पात्र

वड्डी चे लोकनियुक्त सरपंच कु. डॉ. यशोधराराजे शिंदे सरकार यांचे वडील श्री महेंद्रसिंह शिंदे सरकार यांचे वड्डी येथे गायरान जमीनीवर अतिक्रमण आहे. म्हणून वड्डी चे लोकनियुक्त सरपंच पद अपात्र करण्यासाठी कुमार कांबळे माहिती अधिकारी यांनी सांगली जिल्हा अधिकारी यांच्या कडे दावा दाखल केला होता. तरी मा. सांगली जिल्हा अधिकारी राजा दयानिधी यांना प्रकरणाची सुनावणी सुरू केली होती.
सदर प्रकरणाची सत्यता पडताळून अतिक्रमण नसल्याचे निदर्शनास आल्याने सांगली जिल्हा अधिकारी यांनी सरपंच पद पात्र केले. वड्डीचे लोकनियुक्त सरपंच कु. डॉ. यशोधराराजे महेंद्रसिंह शिंदे सरकार हे उच्चशिक्षित सरपंच असुन ते महाराष्ट्रातील सर्वात तरुण सरपंच म्हणून त्यांची ओळख आहे. वड्डी गावाला एक उच्चशिक्षित तरुण सरपंच मिळाल्याने वड्डी गावचा चांगला विकास सुध्दा झाला आहे. सरपंच यांनी गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महानगर पालिका चा करा बाबतचा प्रश्न हि मार्गी लावला आहे. तसेच वड्डी गावाचा विकासाचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यातच सरपंच पद अपात्रेचा दावा दाखल केल्याने गावात नाराजीचे वातावरण होते. आज निकाल लागल्यानंतर सरपंच पद पात्र आहे असे समजल्यानंतर वड्डी गावात फट्याक्याची आतषबाजी करुन गावात पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आले.