सांगली | प्रतिनिधी

सांगली शहरात महिला पोलीस वंदना महेश कांबळे (वय ३९, रा. इनाम धामणी, ता. मिरज) पहिले लग्न झाले असताना फसवून दुसरे लग्न केले. याबाबत पती महेश लक्ष्मण कांबळे (वय ३६, रा. आष्टा) यांनी पत्नीने पहिल्या लग्न झालेचे लपवून आपली फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सांगली ग्रामीण पोलिसांनी महिले विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. महेश कांबळे हे आष्टा येथे मजुरी करतात. त्यांचा विवाह वंदना हिच्याशी २२ जून २०२२ रोजी झाला होता. वंदना हिच्यासोबत जनाबाई चंद्राप्पा कांबळे (वय ६०), राजशेखर चंद्राप्पा कांबळे (वय ४२), उषा शंकर माळी (वय ४०, सर्व रा. इनाम धामणी) यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत.