मिरज | प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

मिरज : राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दादा दबडे म्हणाले की; शिवसेनेच्या संजय राऊत यांनी अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिसभाई नाईकवडी यांच्यावर खोडसाळ पणाने आरोप केलेले आहेत. महाविकास आघाडी मुस्लिम समाजाचा केवळ ओट बँक म्हणून वापर करीत होती.
आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्यांक आतील मुस्लिम चेहरा म्हणून आमदार इद्रिसभाई नाईकवडी यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याने ही त्यांची पोट दुखी आहे. आमदार इद्रिस नाईकवडी यांना विधान परिषदेवर संधी दिल्याने मुस्लिम समाज महाविकास आघाडीकडे मुस्लिम समाज वळेल या भीतीपोटी त्यांनी असे वक्तव्य केले आहे.
आमचे नेते आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या विरोधात यापुढे संजय राऊत यांनी चुकीचे वक्तव्य केल्यास त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा अजित पवार गटाचे राष्ट्रवादी मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दादा दबडे यांनी दिला आहे.