श्रीकर बायोटेक कंपनीच्या कराटे औषध कंपनीवर बंदी घाला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कृषी जिल्हा अधीक्षकांना निवेदन

मिरज | प्रतिनिधी | परशुराम बनसोडे


खटाव येथे श्रीकर बायोटेक कंपनीच्या कराटे औषध किटकनाशक फवारणीमुळे द्राक्ष बाग कापूस मक्का वाळून गेले सुमारे 45 लाख रुपये चे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी परशुराम बनसोडे यांनी केले आहे.


खटाव (ता मिरज )येथे दोन शेतकऱ्यांची सुमारे तीन एकर द्राक्षबागेवर तसेच दोन एकर मका आणि ३ एकर कापूस पिकावर श्रीकर बॉयोटिक प्रा. लि. कंपनीच्या कराटे नावाच्या कीटक नाशकांची फवारणी केल्यामुळे पूर्णपणे बागा वाळून गेल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशा बागाचे त्वरीत पंचनामा करून अशा औषधे कंपनीकडून त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रकाश दळवी, आपू आणाप्पा नरदे, अनुसया दळवी इत्यादी अनेक शेतकरांचे नुकसान झाले आहे.

यामध्ये प्रकाश रामू दळवी गट न. १६९ या जमीनीमध्ये सुमारे ६०० झाडे असणाऱ्या ३० गुंटे बागेचा प्रचंड नुकसान झाले आहे तसेच आप्पू आणाप्पा नरदे गट न. ८६३ यामध्ये सुमारे १८०० झाडे असणाऱ्या २ एकर बागेचा प्रचंड नुकसान झाले आहे. या दोन्ही बागेला यंदा द्राक्षे घड भरपूर पडले होते. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच अनुसया आण्णासो दळवी गट न. १४८ यामध्ये असणाऱ्या सुमारे दीड एकर मका पिक दोन महिन्यापूर्वी वाळून गेले आहे.

तसेच गावचे पोलीस पाटील भैराप्पा पाटील यांचे कापूस पिक सुमारे ३ एकर पिकांवर औषध फवारणीमुळे सुद्धा पाने करपू लागले आहे. त्यामळे खटाव गावात श्रीकर कंपनीच्या कराटे औषध फवारणी मुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकासान झाले.

तालुका कृषी अधिकारी, तलाठी आणि कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष द्राक्षे बागेला भेट देऊन पंचनामा करावा. अन्यथा कृषी तालुक्यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा ईशरा दळवी, नरदे व पाटील इत्यादी शेतकऱ्यांनी दिले आहे. शेतकऱ्यांनी तक्रार मिरज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे.

तक्रारीची दखल घेत खटाव येथील एका औषध झाडाझडती तालुका कृषी अधिकारी व त्यांच्या टीमने केली असून दुकानातील औषधांची तपासणी करण्यात आली आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर कृषी सहायक सचिन पवार पांढरे साहेब यानी भेट देऊन नुकसानग्रस्त द्राक्षबागा कापूस मका पिकांचे पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button