जिल्हा परिषद समाज कल्याण निधी वाटपात चंगू मंगुचा हस्तक्षेप; आचारसंहितापूर्वी 11 कोटीचा निधी मर्जीतील गावांना देण्यास धावपळ-महादेव दबडे(राष्ट्रवादी मिरज)

मिरज | प्रतिनिधी | परशुराम बनसोडे

जिल्हा परिषद समाज कल्याण निधी वाटपात चंगू मंगुचा हस्तक्षेप, आचारसंहितापूर्वी ११ कोटीचा निधी मर्जीतील गावांना देण्यासाठी धावपळ, कागदोपत्री लवकरच पोलखोल करणार … राष्ट्रवादीचे नेते महादेव दादा दबडे यांचा इशारा.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्यामुळे जिल्ह्या मध्ये चर्चेत असणाऱ्या जोडगोळी (चंगू मंगूं ) ने जिल्हा परीषद समाज कल्याण विभागाचे ११ कोटी निधी मर्जितील गावांना आणि ठेकेदारांना बेकायदेशीर रित्या आणि मनमानी पद्धतीने देण्याचा घाट घातल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी केला आहे.

महादेव दबडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व गावांना समान निधी वाटप करावा ही मागणी उचलून धरली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट हा भाजप मित्र पक्ष असल्याने पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे हे मिरज विधानसभा क्षेत्रातील ग्रामीणचा विकासासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कार्यालयातील चंगू मंगू हे पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून त्यांच्या परस्पर मर्जीतील गावांना आणि ठेकेदारांना निधी वाटप करत असल्याचा आरोप महादेव दबडे यांनी केला आहे.

३४ कोटीचा जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा निधी ३१ मार्च अखेर खर्ची पडणे अपेक्षित असताना त्यातील फक्त २३ कोटीचा निधी खर्ची पडला आहे. उर्वरित अकरा कोटीचा निधी अद्याप शिल्लक आहे. आचारसंहिता लागू होण्या पूर्वी जर चंगू मंगु नी अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकून मर्जीतील गावांना आणि ठेकेदारांना हा निधी दिला तर या चंगू मंगूंचा लवकरच कागदोपत्री पोलखोल करणार आहे. असा इशारा महादेव दबडे यांनी केलाआहे. आचारसंहिता लागणार आहे म्हणून चंगू मंगू ची धावपळ सुरू आहे.

हा निधी समसमान वाटप न करता चंगूं मंगूंच्या मर्जीतील गावांना नियम बाह्य रित्या वाटप चालू असल्याचे समजत आहे. सांगली जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा ११ कोटीच्या निधीचे बेकायदेशीर पणाने चालू असलेले वाटप थांबविण्यात यावे. सन २०१८- २०१८ ते २०२३-२०२४ पर्यंत पंचवार्षिक बृहत आराखड्याला पुणे समाज कल्याण आयुक्तांची परवानगी असताना मान्यता संपल्यानंतर सुद्धा चंगू मंगूंच्या दबावामुळे समाजकल्याण समिती अकरा कोटी रुपयांच्या निधीचे बेकादेशीर वाटप करत असल्याचे समजले आहे. हे तात्काळ थांबविण्यात यावे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू असा इशारा महादेव दबडे यांनी दिला आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button