कुपवाड : प्रतिनिधी

कुपवाड : कर्मचारी राज्य बिमा निगम (श्रम एवं रोजगार मंत्रालय भारत सरकार), क्षेत्रीय कार्यालय, मुंबई द्वारा प्रसिद्ध दि.१७.०९.२०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार, सांगली जिल्ह्यासाठी कर्मचारी राज्य विमा निगमच्या स्थानिक समितीवर कुपवाड आणि मिरज एमआयडीसी क्षेत्रासाठी सदस्यपदी म्हणून कृष्णा व्हॅली चेंबरचे संचालक रमेश आरवाडे, मिरज असो. संचालक संजय अराणके, संस्थेचे व्यवस्थापक अमोल पाटील, बाष्को इंजीनियरिंग चे पवन सगरे, शाह प्रेसिकास्टचे संजय जाधव, यांची नियुक्ती झाली.
सदर नियुकी ही कर्मचारी राज्य विमा निगमचे सहाय्यक संचालक नीरज कुमार यांच्या वतीने करण्यात आली. दोन महिन्यातून एकदा सदर समितीची मीटिंग होते. सदर मीटिंगमध्ये औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या कर्मचारी राज विमा योजनेच्या असणाऱ्या अडी अडचणी वर चर्चा केली जात.
या निवडीमुळे औद्योगिक वसाहती मधील कामगारांच्या अडचणींचे निरसन होणार आहे त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातून सदस्य पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.