
मुबंई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणशिंग फुंकले. मुंबईच्या गोरेगाव पुर्व येथे मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात ते बोलताना म्हणाले की; आगामी निवडणुकीत कोणाशी आघाडी नको, कोणाशी युती नको. राज ठाकरे यांनी स्वबळाची घोषणा केली आहे. तसेच विधानसभेनंतर मनसे हा सत्तेत असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.