कुपवाड | प्रतिनिधी |
कुपवाड : जिनवाणी वीर महिला मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव विविध प्रमाणे साजरा.

कुपवाडमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे जिनवाणी वीर महिला मंडळाच्या वतीने नवरात्र अलंकार उत्सव साजरा करण्यात आला. नऊ दिवस वेगवेगळ्या स्वरूपाच्या स्पर्धा घेऊन महिलांमध्ये उत्साह निर्माण केला. स्वागत व प्रास्ताविक श्री अनिल कवठेकर यांनी केले.
जिनवाणी वीर महिला मंडळाच्या सौ प्रतिभा हसुरे, कावेरी उपाध्ये, वर्षा हसुरे सौ आडमुठे सौ संगमे सौ पाटील आदी महिलांनी कार्यक्रमाचे आयोजन संयोजन केले.
त्या नऊ दिवसांमध्ये रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, निबंध स्पर्धा, दांडिया वेशभूषा, पारंपारिक वेशभूषा, या स्पर्धेचा समावेश तसेच महिलांचा आवडता खेळ ‘खेळ पैठणीचा’ हा खेळ सुशांत पाटील यांनी घेतला. त्यांच्या कार्यक्रमातिल फनी गेम्स, हास्य विनोदाच्या महिलांनी आंनद घेतला.
प्रथम क्रमकांच्या बक्षीसाचा मान सौ. बाबासो कर्नाळे यांनी पटकावला.त्याना प्रथम क्रमांक बक्षीस म्हणून फ्रीज देण्यात आला. इतर सर्व स्पर्धेच्या बक्षीसांचे वितरण ही यावेळी करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री महावीर भोसेकर, सुनिल कवठेकर, वसंत संगमे, महावीर रेवाण्णा, अभय भोसेकर, विजय खोत, सुनिल पाटील, सचिन पाटील, राजू हसुरे, अजित उपाध्ये, गुंडू हसुरे उपस्थित होते.