मिरज | प्रतिनिधी |

मिरज अर्जुनवाड घाट येथे दुर्गा माता देवी मूर्तीचे विसर्जन करतेवेळी तीन तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडाले. त्यातील दोघांना वाचविण्यात यश आले आणि एक तरुण बुडाला. अर्जुनवाड घाट येथे दर्गा माता विसर्जन करताना तीन तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडाले असता आयुष हेल्प लाईन आपत्कालीन पथकाचे सदस्य श्री योगेश आनंदे यांनी तात्काळ पाण्यात उडी घेऊन दोघा तरुणांना वाचवले परंतु तिसरा तरुण बुडत असल्याचे लक्षात आले नाही. त्यांच्यासोबत कोणी मदतीलाही आले नाही.
तिसरा तरुण बुडाला बुडाल्याची माहिती योगेश आनंदे यांनी आयुष हेल्पलाइन टीमला दिली असता तात्काळ आयुष हेल्पलाइन टीम घटनास्थळी दाखल होऊन सदर नदीपात्रामध्ये शोध मोहीम सुरू केले बराच वेळ नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली.
यावेळी शोध मोहीम साठी आयुष हेल्पलाइन टीम प्रमुख अविनाश पवार, नरेश पाटील, निसार मर्चंट, दिलावर बोरगावे, चिंतामणी पवार, सुरज शेख, साहिल जमादार, प्रमोद जाधव, सिद्धार्थ रण खंबे, अग्निशामक दलाचे जवान व १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर, चालक आणि पोलीस यावेळी उपस्थित होते.