
मिरज : मिरज बेडग आडवा रस्त्या येतील कत्तलखान्यासमोर गेट जवळ अज्ञाताने मृत म्हैस टाकून पलायन. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. मोठी दुर्गंधी पसरलेली आहे.
त्यामुळे अनेक रोगराई होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ उपयोजना करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. अशा पद्धतीने मृत जनावरांचे विल्हेवाट न लावता गेट जवळ टाकून पलायन करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे तातडीने या ठिकाणची टाकलेले मृत जनावरांचा विल्हेवाट महानगरपालिकेने लावावी अशी मागणी करत आहेत.