
सांगली : बुधवार दि. २ ऑक्टोंबर २०२४ रोजी महात्मा गांधी जयंती ड्राय-डे च्या दिवशी प्रकाश खोत ( वय ५२ वर्षे, रा. शिवशंकर वसाहत, सुभाषनगर, मिरज ) याच्याकडून गोवा बनावटीची विदेशी दारू विक्री करणाऱ्या इसमास सांगली स्थनिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून ताब्यात घेऊन त्याच्या जवळील असलेल्या ७५० मिलीच्या १६३ बाटल्या आणि १८० मिलीच्या ११ बाटल्या असा हा एकूण ४१ हजार २१० रु. किंमतीचा गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त केली. त्याचा विरोधात बुधवार दि. २ ऑक्टोंबर २०२४ रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या अधिक माहितीनुसार संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी महात्मा गांधी जयंती ड्राय डे चे अनुषंगाने अवैध व्यवसायांवर कारवाई करणेचे सुचना दिली होती. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकाने ड्राय डे चे अनुषंगाने अवैध धंद्याची माहिती घेवून त्यांचेवर कारवाईचे आदेशित केले होते.
त्या अनुशंगाने दि. ०२/१०/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोलीस इम्रान मुल्ला, संकेत मगदूम यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीने इसम नामे प्रकाश खोत, रा. सुभाषनगर, मिरज हा याच्या राहत्या घरासमोर गोवा बनावटीची विदेशी दारू विक्री करीत आहे. त्या माहितीने सुभाषनगर येथील प्रकाश खोत याचे घराजवळ पारख ठेवली असता सदर इसम लाल रंगाची गोणी घेवून संशयास्पद बसलेल्या दिसल्याने त्याची विचारणा केली आसता, त्याचे नाव प्रकाश यशवंत खोत असे सांगितले. त्याचे कब्जात असलेल्या गोणीत गोवा बनावटीची विदेशी दारू मिळून आली. त्याचा अधिक तपास केला असता घराच्या पाठीमागे झाडीत लपवून ठेवलेला दारूचा माल काढून दिला.
सदर विदेशी दारुच्या बाटल्या सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त करून मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.