सांगली स्था. गु. अन्वेषणाकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस

सांगली : विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून चार लाख पन्नास हजार रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत संशयित आरोपीस स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या पथकाने मुसक्या आवळल्या.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात (ता.१३) रोजी सराईत संशयित आरोपी सॅमसन रुबीन डॅनीअल (वय २५ वर्षे, रा. बेतुरकर पाडा क्वालीटी कंपनी, डॅनियल हाऊस, रुम नं.०५ कल्याण पश्चिम जि. ठाणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपिकडून १,२५,०००/- रू. किंमतीची एक सोन्याचा नेकलेस, १,२५,०००/- रू. किंमतीची एक सोन्याचा गंठण, १,२५,०००/- रू. किंमतीची एक सोन्याचा लक्ष्मी हार, ७५,०००/- रू. किंमतीची प्रत्येकी सोन्याच्या तीन आंगठ्या. हा असा एकुण – ४,५०,०००/- रु. ( चार लाख पन्नास हजार रूपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.

याबाबत फिर्याद दत्तात्रय संपतराव पाटील (वय वर्ष ४५ व्यवसाय, रा.स्फूर्तिचौक विश्रामबाग,सांगली) यांनी विश्रामबाग पोलिसांत दिली होती. त्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे घडत असल्याने संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली व रितु खोखर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचे गुन्हे व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

त्या सुचनेने पोनि. सतीश शिंदे स्था. गु.अ शाखा यांनी स्था. गु अन्वेषणचे सपोनि. नितीन सावंत यांचे एक पथक तयार करुन घरफोडी, चोरीचे गुन्हे करणारे संशियत इसमांची माहिती व कारवाईचे आदेश दिले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हवालदार सागर लवटे यांना बातमीदारांकडुन सॅमसन रुबीन डॅनीअल या इसमाने सदरचा गुन्हा केल्याची व सध्या वास्तवास सुरत (गुजरात) येथे असल्याची खबर मिळाली. त्या माहितीने स्था. गु. अ. शाखेडील सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व त्याचे पथक तातडीने गुजरातला रवाना होऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

या गुन्ह्याच्या पुढील तपास कामी ताब्यात घेवुन विश्रामबाग पोलीस ठाणे येथे रिपोर्टासह दि.२८/०९/२०२४ रोजी हजर केले असता; अधिकारी पोउपनि. स्वप्नील पोवार यांनी मा.न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाकडुन आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपी इसम सॅमसन डॅनियलच्या अधिक चौकशी केलेनंतर आरोपीने चोरी केलेला मुद्देमाल वांगणी जि. ठाणे येथे दिलेची माहिती दिली.

पोलीस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे विश्रामबाग पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. स्वप्नील पोवार यांचे सोबत पोहेकों/ बिरोबा नरळे, पोहेकों / दरिबा बंडगर, पोना/ संदिप नलावडे, पोकों / महमद मुलाणी व पोकों/ सुनील पाटील यांचे पथकाने वांगणी जि. ठाणे येथे जाऊन वरील मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

सदर कारवाई संदिप घुगे पोलीस अधिक्षक सांगली, रितु खोखर अपर पोलीस अधिक्षक सांगली, विमला एम. उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांच्या मार्गदर्शानाखाली स्था गु. अ. शाखा सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहा.पोलीस निरीक्षक
नितीन सावंत, सहा. पोलीस निरीक्षक/पंकज पवार, पोहेकॉ/ सागर लवटे, पोहेकॉ/दरिबा बंडगर, पोहेकॉ सतीश माने, अनिल पैनापुरे, पोना/ संदीप नलवडे, पोना/सोमनाथ गुंडे, पोकों / विनायक सुतार यांनी केले.

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी कल्याण, रत्नागिरी, जळगाव, सुरत (गुजरात), व खंडवा (मध्य प्रदेश) अशा ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हाचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पोवार करीत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button