
जैनापुर येथे अज्ञात वाहनाच्या अपघातात मिरजेतील तरुण ठार झाला.
सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मिरजेतील १७ वर्षीय तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे.
प्रेम विजय गोसावी ( रा. कोल्हापूर रोड गोसावी गल्ली मिरज ) असे आपघातत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर अपघाताचा गुन्हा जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराकडे पायी चालत असताना काळाने घाला घातला.