
कुपवाड : कुपवाड पोलिसांची मोठी कारवाई गुरुवार दि. ०३.१०.२०२४ रोजी सकाळ दरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेली सुगंधीत सुपारी गुटखा गाडीसह १४ लाख ४८ हजार ३२० रु . किंमतीचा मुद्देमाल कुपवाड पोलिसांकडून जप्त करण्यात आला.
शुभम दिलीप सावंत वय २५ वर्षे धंदा चालक ( रा. सावंत गल्ली, पदमाळे, ता. मिरज, जिल्हा सांगली ) सचिन बापू चौगुले ( वय ३९ वर्षे, रा. एस. टी. स्टैंड जवळ, पदमाळे, ता. मिरज, जिल्हा सांगली ) या दोघांवर कुपवाड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.
कुपवाड पोलिसांच्या अधिक माहितीनुसार पोहेकॉ/ संदीप पाटील, पोहेकों/ गजानन जाधव यांना मिळालेल्या गोपनीय बातमीमार्फत एक पांढऱ्या रंगाची टाटा एसीई चार चाकी माल वाहतूक गाडी आर.टी.ओ. क्रमांक एम.एच. ११ सीएच ६५२३ महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेली सुगंधीत सुपारी गुटखा घेऊन सावली कुपवाड रोडवर येणार असल्याने त्या अनुषंगाने कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांच्या आदेशाने सावळी येथे सापळा रचून माल वाहतूक टॅम्पो, टेम्पो चालक शुभम सावंत व त्याचा बाजूस बसलेल्या इसम सचिन चौगुले यांना ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातील ४ लाख रु. किंमतीची माल वाहतुक व इसमांचे कब्जातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेली १० लाख ४८ हजार ३२० रु. किंमतीची सुगंधी सुपारी गुटखा, पान मसाला व सुगंधी तबांखू जन्य पदार्थ असे हा १४,४८,३२०/- रु. चा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर हे करित आहेत.