
आरग : श्री दुर्गामाता दौड आरग ( ता.3 ) गुरुवार पासून सुरवात व ता.१२ शनिवार पर्यन्त म्हणजेच घटस्थपणा ते विजयादशमी पर्यन्त होणार आहे.
या दौडचे हे तिसरे वर्ष आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक आरग येथे शिवभक्त एकत्र येऊन गावाभागातून रोज वेगवेगळ्या मार्गाने दौड निघते. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय., धर्मवीर छ. संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदुराष्ट्र की जय, जय श्री राम, दुर्गामाता की जय, हर हर महादेव अशा घोषणा देत दौड निघते
या दौड मध्ये _युवक युवती, महिला वर्ग पुरुष वर्ग माता भगिनीं लहान मुले-मुली सामील असतात. दौड ची सुरवात हळूहळू लोकांची सख्या वाढत-वाढत ही शेकडो ते शेवट पर्यंत हजारो च्या संख्येने या दौडमध्ये शिवभक्त सामील होतात.
विजया दशमी शेवटच्या दिवशी महादौड पार पडते. हजारोच्या संख्येने शेवटच्या दिवशी पारंपारिक वाद्य..ने विविध वेशभूषा छ. शिवाजी. महाराज जिजाऊ माँ साहेब श्री राम यांच्या वेशभूषा असते. दुर्गामाता दौड ची हेतू युवा पिढी मध्ये, देश प्रेम धर्मप्रेम रुजावे, छत्रपती शिवरायांचा वारसा युवा पीडी काडून तो जपला जावावं ह्या दौडचा हेतू आहे. दौड मध्ये प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र, म्हणून क्षत्रिय धर्माचे प्रतीक असलेलं शस्त्र हातात घेऊन, भगवा जेंडा, शिवभक्त डोक्यावर भगवी वारकरी पांढरी टोपी परिधान करतात. छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाचा पूजन करून सुरवात होते.
श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री नितीन दादा चौगुले यांच्या नेतृत्वाने आरग मध्ये दौड होते. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आरग चे धारकरी व श्री रोहित शिवाजी निकम आणि श्री.अनिकेत दिनकर पाटील यांच्या पुढाकारने ही दौड आरग मध्ये पार पडते.