पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर हे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर म्हणून सन्मानित करण्यात आले.

सांगली : पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर हे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर म्हणून सन्मानित करण्यात आले. मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्याहस्ते पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर याना महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती बाबत सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास उपआयुक्त विजया यादव, सहायक आयुक्त सचिन सागावकर, अनिस मुल्ला,जन संपर्क अधिकारी धनंजय हर्षद, स्वच्छ सर्व्हेक्षण विभागाच्या शहर समन्वयक अधिकारी वर्षाराणी चव्हाण, प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग रंगराव आठवले, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष यादव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर यानी उपस्थितांना कोणत्याही क्षेत्रात कामगिरी करताना घाबरु नका. भीतीचा आनंदाने सामना करा असे सांगत महापालिकेने मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून चंदू चॅम्पियन हा चित्रपट महापालिका शाळात दाखवावा अशी विनंती प्रशासनाकडे केली.