मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत

सांगली: मंगळवार दि. १ऑक्टोबर २०२४ रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्याच्या अनुषंगाने जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विटा येथील बळवंत महाविद्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे व जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार शहाजी पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे, मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता, माजी जि. प. उपाध्यक्ष सुहास बाबर, आनंदराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.