आरगच्या उपसरपंच पदी सोमनाथ चौगुले यांची बिनविरोध निवड..

आरग : रविवार दि.२९ /०९/२०२४ रोजी मिरज तालुक्यातील आरग ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंच पदी सोमनाथ अण्णासो चौगुले यांची बिनविरोध निवड झाली. आरगेचे सरपंच सौ.मनीषा कोरबु यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी ग्रामसेवक संजय गायकवाड यांनी कामकाज पाहिले.
निवडीनंतर सोमनाथ चौगुले यांच्या समर्थकांकडून फटाक्यांची आतीश बाजी व गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. सर्व सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने नूतन उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. मावळते उपसरपंच सचिन बाबासो पाटील यांनी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार कालावधी पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवर सोमनाथ अन्नसो चौगुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी उपसरपंच पदासाठी सोमनाथ चौगुले यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने चौगुले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी उपसरपंच चौगुले म्हणाले, उपसरपंच पदाच्या रूपाने मिळालेल्या संधीचे सोने करून ग्रामस्थांचा विश्वास सार्थ करण्यासह समस्येचे वेळीच निरसन करून गाव विकास भिमुख बनवण्यासाठी प्रयत्न करीन. नागरिकांना जास्तीजास्त सुविधा देऊ व शासनाच्या योजना तळागाळात पोहचविण्याचे काम प्रभावी करेन असे चौगुले बोलताना म्हणत होते.