
परशुराम बनसोडे यांची प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाचे मिरज तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
जत येथे कार्यकर्ते मेळाव्यात सोलापूर जिल्हा अध्यक्ष, दत्ता भाऊ मस्के प्रहार जनशक्ती शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील जत तालुका अध्यक्ष प्रमुख सुनील बागडे मिरज तालुका प्रमुख गोरख वनखडे प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मिरज तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष वाढीसाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन बच्चू कडू यांना साथ देणार असल्याची परशुराम बनसोडे यांनी सांगितले आहे. परशुराम बनसोडे यांची निवड झाल्यामुळे गावात त्यांचा मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.