बोलवाड हद्दीमधील गट नंबर 194 मध्ये ओढा पात्रावर अतिक्रमण करून प्लॉटिंगचे काम जोमाने सुरू

मिरज : मिरज तालुक्यातील बोलवाड हद्दीतील गट नंबर 194 मध्ये बपर झोन ओढा पात्रावर अतिक्रमण करून N A प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये खरेदी विक्री प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की बोलवाड हद्दीमधील गट नंबर 194 मध्ये ओढा पात्रावर अतिक्रमण करून प्लॉटिंगचे काम सुरू आहे. सदर जागेवर कोर्ट केस असताना देखील खरेदी-विक्री प्रक्रिया ही महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाची चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन कारवाई करण्याचे मागणी करण्यात आले आहे.

सदर जागेवर मुंबई हायकोर्ट मध्ये केस चालू असताना खरेदी विक्री कशी होते. सदर जागेवर पांडुरंग डेव्हलपर्स इस्टेट एजन्सी यांच्याकडून प्लॉटिंगचे विक्री सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते.

त्यामुळे तत्काळ या प्रकरणाचे सखोल चौकशी करून N A ची प्रक्रिया व प्लॉटिंगची प्रक्रिया तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत त्यामुळे सदर प्रकरणाची येणाऱ्या आठ ते दहा दिवसात चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आले आहे.

येणाऱ्या आठ दिवसात या प्रकरणाची चौकशी न झाल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती परशुराम बनसोडे यांनी दिली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button