
मुबंई मंत्राल्यासमोर आमदार बच्चू कडू प्रहार संघटनचे नेते यांनी भर पावसात दिव्यांगासाठी आंदोलन केले. भर पावसात बच्चू कडू यांनी दिव्यांगाच्या अनेक मागण्यासाठी आंदोलन केले. बच्चू कडू म्हणाले 3-4 बैठका मुख्यमंत्री यांनी घेतल्या. घरकुल, पगारवाढ, दिव्यांग भवन, बोगस प्रमाणपत्रवर कारवाई यावरती बैठका झाल्या. मात्र यावर प्रशासनाणे लक्ष दिले असे ते म्हणाले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा आमदार कडू यांनी दिला.