शासकीय गेस्ट हाऊसमध्ये आगामी विधानसभा मतदारसंघातील काही ठराविक सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग संपन्न

सांगली विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक चर्चेत एकमत

सांगली : आज सांगलीत शासकीय गेस्ट हाऊसमध्ये आगामी विधानसभा मतदारसंघातील काही ठराविक सामाजिक व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग संपन्न झाली. सदर मिटिंगमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सांगली विधानसभा मतदारसंघाचा राज्यातील इतर विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत विकास कामाच्या बाबत व अन्य कामाच्या बाबत मागासलेला दिसत आहे.

सध्या प्रत्येक इच्छुक उमेदवार आगामी निवडणुक लक्ष्यात घेता वेगवेगळ्या प्रश्नाला वाचा फोडत दिसत आहे; पण हेच इच्छुक उमेदवार इतर वेळेला आपापल्या काम करण्यात व्यस्त असतात. पण ज्यावेळी रस्तावर उतरण्याची वेळ येते त्यावेळेस टाळाटाळ करतात. कारण त्यांना कोणाचा वाईटपणा घ्यायचा नसतो असो हा त्यांचा त्यांचा वैयक्तिक विषय आहे.

आपण या चळवळीतील कार्यकर्ते पक्ष बाजूला ठेवून आपल्या शहराच्या व मतदार संघाच्या विकासासाठी शहरातील विविध प्रश्नांवर विषयांच्यावर आवाज उठवून संघर्ष करून काम करत असतो मग कोणाच्यातरी मागे जाण्यापेक्षा आपल्या चळवळी तील कार्यकर्त्यांनी एकत्र बसून सांगली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवावी का यावर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली. या चर्चेतून निघालेला निष्कर्ष असा आहे की आपण सांगली विधानसभा निवडणूक शंभर टक्के लढवायचीच असे एकमताने ठरले आहे. काही दिवसात समविचारी सामाजिक कार्यकर्ते चळवळीतील कार्यकर्ते यांची व सर्व समाज घटकांची मग त्या असोसिएशन्स असतील संघटना असतील यांना सोबत घेऊन व्यापक बैठक वजा मेळावा घेण्यात येणार आहे. पुढील भूमिका लवकरच जाहीर करू असे ते म्हणाले.

यावेळी पद्माकर जगदाळे सर दिलीप पाटील माजी नगरसेवक हनमंत पवार नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर कॉम्रेड उमेश देशमुख समस्त मुस्लिम समाजाचे नेते आसिफ बावा मराठा सेवा संघाचे नितीन चव्हाण तोहिद शेख मुनीर मुल्ला उपस्थित होते

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button