
सांगली: सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्लांना माजी खासदार संजय काका पाटील व काकांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केलेची घटना आज सकाळी साडे सातच्या दरम्यान घडली.
माजी खासदार संजय काका पाटील व त्यांच्या समर्थकांनी माजी उपनराध्यक्ष मुल्ला यांच्या घरात घुसून मुल्ला व त्याच्या घरातीलनातेवाईकांना मारहाण केली.
सकाळी साडेसातच्या सुमारास अय्याज मुल्ला हे फेरफटका मारून घरासमोर बसले होते. यावेळी संजय काका पाटील यांचे पीए खंडू होवळे हे मुल्ला यांच्या घरी आले. संजय काका भेटायला येणार असल्याचे मुल्लाला पीए होवाळेने सांगितले. यावेळी मुल्ला यांनी घरी चहा करायला सांगितला. इतक्यात मुल्ला यांच्यादारी दोन-तीन गाडी येऊन थांबल्या. गाडीतून माजी खासदार संजय पाटीलांसह दहा-पंधरा जण उतरन ते थेट मुल्लाच्या घरात घुसून मुल्ला यांना मारहाण करायला सुरुवात केली.
त्यांना वाचवायला आलेले त्यांच्या घरातील नातेवाईक यांना शिवीगाळ करून जबरी मारहाण केली.
कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आ.सुमनताई पाटील रोहित पाटील कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला.
माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी रोहित पाटील आक्रमक तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.