मिरजेत ईद निमित्त आयोजित कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते महादेव दादा दबडे याच्या कडून मिरवणुकांचे स्वागत करून मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा.

मिरज शहरात ईद-ए-मिलाद निमित्त भेटी देवून निघालेल्या मिरवणूकीचे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दादा दबडे यांनी स्वागत केले. यावेळी त्यांचा ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांच्या विविध मडळांनी महादेव दबडे यांचा सत्कार करण्यात आला.
मिरज मध्ये ईद-ए-मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने मिरज शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरातील हजारो मुस्लिम बांधव आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बैलगाडी, उंट, घोडे यासह शहरातील प्रमुख मार्गावरुन ही मिरवणुक काढण्यात आली. शांततेत आणि मोठ्या उत्साहात ईद-ए – मिलाद सण साजरा करण्यात आला. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी अनंत चतुर्थी नंतर ईद-ए-मिलाद साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. या मिरवणूकीमध्ये जे नागरिक आणि मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. त्यांचे राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव दबडे यांनी स्वागत केले.
यावेळी त्यांनी येणाऱ्या मिरवणूकीत सहभागी होऊन सर्वाना शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांचा दर्गा खादीम जमाततर्फे सत्कार करण्यात आला.