
सांगली : महाराष्ट्र शासनाकडून नुकताच मंजूर केलेले धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा मिटरड आणि टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ व त्यासाठी मंजूर केलेले 50 कोटी रुपये अनुदान याबद्दल शासनाचे आभार व्यक्त केले. परंतु यामध्ये सभासद नोंदणी फी शुल्क माफक असावी,सन 2010 पासून रिक्षा परवाना नूतनीकरणासाठी घेतला गेलेला आहे.आज पर्यंतचा कोट्यावधी रुपयांचा विलंब शुल्क हा (महसूल) शासनाने गेल्या 14 वर्षापासून रिक्षा व टॅक्सी चालकांकडून जमा करून घेतला आहे.
तो महसूल देखील याच महामंडळासाठी वापरण्यात यावा व बांधकाम कामगारांना मिळत असलेल्या सर्व योजनांचा लाभ देखील ऑटो रिक्षा, टॅक्सी कल्याणकारी मंडळात समावेश करावा. तसेच सदरचे फॉर्म हे ऑनलाइन पद्धतीने भरून घ्यावेत. म्हणून आज स्वराज्य रिक्षा संघटनेच्या वतीने सदर मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री श्री एकनाथरावजी शिंदे, परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कोल्हापूर यांना ई-मेल द्वारे तर जिल्हाधिकारी सांगली व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांना समक्ष भेटून देण्यात आले.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री प्रसाद गाजरे साहेब यांनी संघटनेची मागण्यांचे निवेदन वाचुन सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या मागण्या शासनाकडे पाठवुन देवु असे आश्वासन दिले. यावेळी रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रामभाऊ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री राजू म्हेतर, कार्याध्यक्ष श्री अजित पाटील व मिरज शहर अध्यक्ष श्री शकील सय्यद उपस्थित होते.