
कुपवाड : एका दै.वृत्तपत्राचे कुपवाड शहर पत्रकार ऋषिकेश माने (वय ३१, रा. अहिल्यानगर, जिल्हा परिषद शाळेसमोर कुपवाड ) यांना रविवार दि. १५/०९/२०२४ रोजी रात्रौ साडे आकराच्या सुमारास चार संशयित आरोपीकडून बेदम मारहाण करण्याची घटना घडली. याप्रकरणी कुपवाड पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून या चार संशयित आरोपींना कुपवाड पोलिसांनी अटक केली आहे. अमीन मेहबुब शेख (वय ३०), रफिक अब्दुल शेख (वय ३५ दोघेही रा.अहिल्यानगर, कुपवाड), धनाजी मारुती बुदनूर ( वय ३७ ) व मुबारक हसीउल्ला सहा ( वय ३५ दोघेही रा. प्रकाशनगर, कुपवाड ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नावे आहे.
पोलिसांच्या अधिक माहितीनुसार फिर्यादी ऋषिकेश माने यांनी काही दिवसांपूर्वी १ सप्टेंबर २०२४ रोजी “वर्गणी माघण्यावरून शिक्षा” व १५ सप्टेंबर २०२४ रोजी “दणदणाटयुक्त मिरवणूक” या दोन बातम्या छापल्यावरून व मंडळाच्या महाप्रसादावेळी रफिक शेख याचेशी झालेल्या वादातून ऋषिकेश माने यांना त्यांच्या घरातून बोलवून चार संशयिताकडुन लाथा बुक्या व दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली व फिर्यादीस सोडण्यास त्याचे आई-वडील पुढे आले असता त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आले.
ही घटना समजताच कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फिर्यादीस उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.