सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ एसटी आगारातील सहाय्यक जावेद अल्लाबक्ष नगरजी या (वय 38 रा.जत ) या एसटी कर्मचाऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केलेची घटना घडली.
जावेद नगारजी हे कवठेमहंकाळ एसटी आगारात कार्यशाळेत सहाय्यक म्हणून काम करीत होते.अडीच वर्षांपूर्वी नगारजी यांची जत येथून कवठेमहांकाळ येथे बदली झाली होती.बदलीमुळे ते निराश झाले होते.नगारजी परत बदलीसाठी कवठेमहांकाळ आगारातील प्रमुख महेश जाधवाकडे दोन वेळा विनंती अर्ज केले होता.
विनंती अर्ज जिल्हा नियंत्रकाकडे पाठविले गेले नसल्याने नगारजी यांची बदली होत नसल्याची तक्रार नगारजी यांची होती.नगारजी यांना आगारप्रमुख व हेडमॅकनिक यानी नगाऱजी यांना आठ दिवस केलेल्या निलंबिताने ते अस्वस्थ होते.
दि.१६ रोजी एसटी जिल्हा नियंत्रकाकडे अर्ज केला होता.त्यात माझ्या बदलीसाठी केलेला अर्ज आपल्याकडे पाठविला नसल्याची व डेपोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार शारीरीक, मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे,यां कारणामुळे आत्महत्या करणार आहे, मला न्याय मिळावा असे म्हटले आहे.
या अर्जाच्या प्रति नगारजी यांनी काही मित्रांना पाठविल्या व रविवारी कवठेमहांकाळ डेपोत येऊन विषप्राशन केले. नगाऱजी यांना मिरज सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारास असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.
आगार व्यवस्थापकांनी बदलीचा अर्ज अडवून ठेवल्याने आत्महत्या करीत असल्याचे जावेद नगारजी यांनी जिल्हा नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.याप्रकरणी संबंधित एसटी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांनी पावित्रा घेतला होता.
जावेद नगारजी यांच्या आत्महत्येचे वृत्त समजतात एसटी कर्मचारी व भीम आर्मीचे जैलाब शेख यांनी सिविलमध्ये धाव घेतली.
नगारजी यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.