गांजा विक्री करणाऱ्या तरुण सांगली पोलिसांच्या जाळ्यात

सांगली : सांगली दि. १३/०९/२०२४ रोजी गांजा विक्रीस आलेल्या तरुणास सांगली शहर पोलिसांच्या जाळ्यात. यासीन शब्बीर मुजावर ( वय वर्ष ३२ रा. साईनाथनगर, कर्नाळ रोड, सांगली ) असे अटक केलेल्या संशयित आरोपी नाव असून त्याचाकडून एकुण ३,३५,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या अधिक माहितीनुसार मा.पोलीस अधीक्षक सो, श्री संदीप घुगे, मा.अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, एम विमला (भापोसे) यांनी आगामी गणेशोत्सवचे पार्श्वभुमीवर अवैध्य व्यवसाय तसेच अंमली पदार्थाचा व्यापार करणारे इसमांची माहिती घेवुन त्यांचेवर कारवाई करणेबाबत आदेश देवुन मार्गदर्शन केले होते.

त्या अनुषंगाने सांगली शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यानी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर व पोहेकॉ संदीप पाटील, पोहेकॉ/ सचिन शिंदे, पोहेकॉ/ विनायक शिंदे, पोकों/ गौतम कांबळे, पोकॉ/ योगेश सटाले, पोकों / प्रशांत पुजारी, पोकों/ गणेश कोळेकर यांचे पथक तयार करुन त्याना अवैध्य व्यवसाय करणारे तसेच अंमली पदार्थ बाळगुन विक्री करणा-या इसमाची माहीती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकामी सुचना दिलेल्या आहेत.

सदर पोलीस पथक कार्यरत असताना दिनांक १३.०९.२०२४ रोजी सदर पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संकेत गळवे याना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सांगली येथील कॉर्नीवल हॉटेल समोर एक अंदाजे ३० ते ३५ वयाचा इसम हा गांजा विक्रीस येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी पथकाला छापा कारवाईबाबत सुचना दिल्या होत्या त्या आदेशाप्रमाणे व मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाणेकडील वरील पोलीस पथकाने सापळा रचुन सदर ठिकाणी गांजा विक्रीस आलेला यासीन शब्बीर मुजावर य ३२ वर्षे रा. साईनाथनगर, कर्नाळ रोड, सांगली यास अंत्यत शितापनी ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातील २,४०,५००/-रू किमतीचे खाकी कलर चिकट टेपचे आवरण असलेले ६ गांजाचे पुढे त्याचे एकुण वजन १२ किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा व एक मोटरसायकल, मोबाईल असा एकुण ३,३५,५०० रुपयेचा मुद्देमाल आरोपीकडुन जप्त केला आहे.

सदर गांजा हा मानवी जिवीतास व शरीरास अपायकारक असल्याने त्या विक्री करणेसाठी आला असता त्यास ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द सांगली शहर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच सदर आरोपीकडे तपास करीत असता त्याने सदर गांजा हा सांगली शहर परिसरात विक्री करणेसाठी आणला असलेचे सांगत आहे. तसेच सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेवर आर्म अॅक्ट व दारुचे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपीस सदर गुन्हयाचे तपासकामी अटक केली असुन सदर गुन्हयाची व्याप्ती मोठी असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार हे करीत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button