
मिरज विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना सुख समृद्धी लाभू दे… या भागाचा विकास होऊ दे… तालुक्याची सर्वांगीण प्रगती होऊ दे… राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांनी असे मागणे गणरायाच्या चरणी मागितले.
महादेवदादा दबडे यांनी गणेशोत्सवामध्ये मिरज शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. यावेळी महादेवदादा दबडे यांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात आली. महादेवदादा दबडे यांनी यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शहर आणि ग्रामीण मधील त्या त्या भागातील मंडळाच्या सदस्यांकडून तेथील समस्या, अडीअडचणी जाणून घेतल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट नेहमीच जनसेवेत सक्रिय आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी पक्षाकडून निश्चितच प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.