
खटाव तालुका मिरज येथील आशा सेविकांना आरग येथील डॉक्टर दीपक शिंदे व गट प्रवर्तक मनीषा मूडसे यांनी अपमानास्पद वागणूक देऊन खटाव गावातील चारही आशा सेविकांना बघून घेण्याची दिली धमकी.
याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिली.

खटाव गावातील शोभा सदाशिव हेळवी दिपाली लोहार गुंडवा नाईक ज्योती नाईक आरग उपकेंद्र अंतर्गत उपकेंद्र खटाव मध्ये अशा सेविका म्हणून कार्यरत आहेत. दि. ११/०९/२०२४ रोजी आरग येतील पीएससीमध्ये डॉक्टर दीपक शिंदे यांना भेटण्यास गेले असता; मानधन संदर्भात प्रश्न विचारले असता धमकी देऊन अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे.
सगळे गाव सोडून फक्त चार अशासेविकांना कामाचे आधारे टार्गेट करणार आणि तुम्ही चौघीजण कसे काम करता असे त्यांचाकडून बोलण्यात आले. याप्रकरणी सखोल चौकशी करून योग्य ते न्याय मिळावा यासाठी आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन यासंबंधी निवेदन देऊन न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तत्काळ चौकशी समिती गठित करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे मिरज तालुका आर्य अधिकारी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी अहवालामध्ये दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.