
कुपवाड : सोमवार दि. ०९/०९/२०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सांगली,बामणोली व कामगार यांच्याकडून .मे. टोटो टोया स्पीन प्रा.लि. कंपनी विरोधात कामगारांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत काम बंद आंदोलन आज मे. टोटो टोया स्पीन प्रा. लि. कंपनी, कुपवाड एमआयडीसी येथे करणयात आले. मागील दोन महिन्यांपासून कामगारांना पगार मिळाला नाही. २०१९-२०२० या काळात बोनस मिळाला नाही. २०१८ पासून किमानवेतन कायद्यानुसार फरक मिळावा. सेवा निवृत्त कामगारांना ग्रॅच्युईटी व इतर फंड मिळाले नाहीत. गेले दहा महिन्यापासून फंड भरला नाही. याकरिता मनसे व कामगारांच्यावतीने काम बंद बेमुदत आंदोलन करण्यात आले.
मनसेकडून या मागण्या करण्यात आले आहेत.
- 1) मे. टोटो टोया स्पीन प्रा.लि. कंपनीचा भूखंड विजेता स्वीच गिअर कंपनी पॉडक्शन साठी बेकायदेशीररीत्या वापरत आहे. त्यावर कारवाई करून वापरात असलेली जागा व यंत्र सामग्री तात्काळ सील करण्यात यावी.
- 2) कामगारांचे थकीत वेतन व कायदेशीर देणी मिळाली पाहिजेत.
- 3) कंपनी मालकाने 2018 साली सर्व कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचे तत्कालीन सहा. कामगार आयुक्त यांच्याकडे मान्य केले होते परंतु आजअखेर ते मिळाले नाही. तरी सर्व कामगारांना किमान वेतनाच्या फरकाचा एरियस पूर्वलक्षी प्रमाणे मिळावा.
- 4) ज्या सेवा निवृत्त कामगारांना ग्रॅच्युईटी व इतर फंड मिळाले नाहीत त्या त्या कामगारांना ते मिळालेच पाहिजेत या सर्व मागण्या आज मनसेकडून टोटो टोया या कंपनीला करण्यात आले आहे