
कुपवाड : मोटरसायकल चोरट्यास कुपवाड पोलीसांनी केली अटक. वृषभ सतिश हराळे वय २२ वर्षे, रा. विल्यम्स वॉनलेस, मैत्रेय चिल्डींगजवळ, विश्रामचाग, सांगली असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पस्तीस हजार रुपयांचा दोन मोटरसायकल जप्त.
पोलीसांच्या माहितीनुसार फिर्यादी प्रभुदास सुधाकर लाड वय ४० वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. विद्यासागर कॉलनी, एस.टी. वर्कशॉप जवळ, मिरज, जि. सांगली यांची मोटसायकल चोरीस गेल्याची तक्रार कुपवाड पोलिसांत केली होती. गणेशोत्सव व मालमत्तेचे गुन्हेचे अनुषंगाने कुपवाड सहा. पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांचे आदेशाने पोहेकों/नामदेव कमलाकर व पोकों/सचिन कनप पेट्रोलिंग करीत असतांना कुपवाड येथील बडे पीर दर्गाजवळ एक इसम मोटरसायकलवर थांबलेला दिसला तसा त्याचा संशय आलेने इसमास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याचेजवळ असलेली MH 10 AU 1901 क्रं. मोटरसायकल विद्यासागर कॉलनी येथून चोरल्याचे कबुली त्याने दिली.
कुपवाड पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्याकडे अजुन एक चोरीची MH 10-AC-5325 या क्रं मोटरसायकल म.गांधी पोलीस ठाणे हद्दीतुन चोरल्याचे निष्पन्न झाले.कुपवाड पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोटरसायकल जप्त करून त्यास अटक केले.
सदर कारवाई कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.दिपक भांडवलकर यांचे आदेशान्वये पो.उपनिरीक्षक श्री. विश्वजीत गाडवे, सपोफी/जितेंद्र जाधव, पोहेकों/विजय कोळी, नामदेव कमलाकर, सचिन कनप, सुधीर गोरे, निलेश कोळेकर, आप्पासो नरुटे, गजानन जाधव, संदिप पाटील, संजय पाचरा, मधुकर सरगर, अविनाश पाटील, चंद्रकांत खोबरखेडे, तसेच म. गांधी पोलीस ठाणेकडील पोना/सुरज पाटील यांनी केली.