
कुपवाड : सोमवार दि.०९/०९/२०२४ रोजी कुपवाड पोलिस एमआयडीसी पोलीस अधिकारी व अंमलदार व गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव २०२४ निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान व आरोग्य तापसणी शिबिरास कुपवाड परिसरातील कामगार वर्ग उधोजक, गणेश मंडळ या रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदर शिबिराचे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीमती रितू खोखर यांच्या हस्ते उद्घाटन करून उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांचे हस्ते रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

या शिबिरास प्रणिल गिल्डा पोलीस उपअधीक्षक मिरज, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर, सहा.पोलीस उप निरीक्षक विश्वजीत गाडवे व पोलीस अंमलदार यांच्यासह 139 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तीनशे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी वसंतदादा पाटील रक्तकेंद्र व रक्तविकार संशोधन केंद्र मिरज ब्लड बँक व स्वामी विवेकानंद हॉस्पिटल बामनोली यांच्या डॉ.अमिस माने व त्यांचे पथक यांनी सहभाग नोंदवला आहे.
यावेळी रितू खोखर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सहा.पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर, सहा. पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे व कुपवाड पोलीस ठण्याचे हवलादर आणि अंमलदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.