कोल्हापूर : उचगावात गणेश मंडळाच्या एका आगमनाच्या मिरवणुकीत लेसर लाईटच्या किरणांमुळे तरुणाचा डोळा लाल होऊन डोळ्यातून पाणी येत असल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याच्या बुबुळाला लेसर किरणांमुळे इजा झाल्याने आत रक्तस्त्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दुसररिकडे टेंबलाईवाडीत हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेसरच्या त्रासाने डोळा लाल होऊन सूज आल्याने बंदोबस्ताला असणारे पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. कोल्हापुरात गणपती आगमन सोहळा मोठ्या उत्सवात व थाटामाटात पार पडतो. लेसरमुळे या घटना झाल्या आहेत .