
कुपवाड : दि. 8/09/2024 पोलीस अधिकारी व अंमलदार व सर्व गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि 9 सप्टेंबर 2024 रोजी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाणे गणेशोत्सव निमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. तरी या शिबिरास कुपवाड परिसरातील सर्व गणेश मंडळांनी सहभागी व्हावे. या शिबिराची सुरवात सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यँत असेल
‘रक्तदान ही सेवा, जनसामान्यांची यालाच मानूया ईश्वरसेवा’…….
- या शिबिराचे प्रमुख पाहुणे
सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, रितू खोखर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, मिरज उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.