सांगली
: गतवर्षीची गणेशमूर्ती विसर्जन करताना तीन तरुण नदीत बुडाले त्यातील एकास वाचविण्यात आले.

सांगलीतील वाल्मिक मंडळाचे कार्यकर्ते गतवर्षाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी घाटावर सायंकाळी पाच -च्या सुमारास गेले होते. मूर्ती विसर्जनासाठी सहा जण नदीपात्रात उत्तरले सहाजनातील तिघेजण नदीपत्राच्या बाहेर आले व उर्वरीत तिघे पाण्यात बुडू लागले. त्यातील एकास मच्छीमाऱ्याने वाचवले. नदीपात्रात पाण्यात वाढ व पाण्याला वेग असल्याने दोघे वाहून गेले. दोघांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी रेस्क्यू टीम आणि महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अंधार झाल्याने शोधण्यास अडथळा येत होता. अजय रजपूत (वय १६), अक्षय मनोज बनसे ( वय १८) असे हे बुडालेले तरुण असून जीव वाचविण्यात आलेल्या तरुणाचे नाव राज चव्हाण आहे.