‘ दणदणाटमुक्त ‘ पर्यावरणपूरक शासनाने नियम व अटीचे पालन करून गणेशोत्सव करा साजरे

कुपवाड : बुधवार दि. ०४/०९/२४ रोजी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळ पदाधिकारी यांची विहानराजे मल्टीपर्पज हॉल सावळी येथे श्री प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज, श्री सचिन सागावकर, सहा.आयुक्त, प्रभाग समिती ३ आणि ग्रामीणगावचे पोलीसपाटील यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव निमित्त बैठक घेण्यात आली.


बैठकीमध्ये येणारा गणेशोत्सव सण तसेच इतर सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नियम व अटीचे पालन करून गणेशोत्सव व इतर सण साजरे करणे बाबत मंडळांना आव्हान कुपवाड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर यांच्याकडून करण्यात आले.

सचिन सागावकर, सहा.आयुक्त, प्रभाग समिती 3 यांनी सूचना केल्या आहेत की, येणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांना रस्ते,विधुत महावितरण किंवा भटक्या जनावराबाबाबत काही समस्या,अडचणी असतील तर त्यांनी त्याचे फोटो काढून किंवा संपर्क करून अडचण मांडावी त्या समस्याचे योग्य तो मार्ग काडून निवारण केले जाईल. गणेश मंडळांना कोणतीही अडचणी येणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. गणेश मंडळांना स्वागतकमान, स्टेजसाठी खड्डे यावर लागणारा कर पालकमंत्र्यांनी पूर्णत माप केला आहे. गणेश मंडळांना लागणारी परमिशन आवश्यक व बंधनकारक आहे. लहान मूर्ती असणाऱ्या जास्तीत जास्त गणेश मंडळाने विहिरीमध्ये गणेश विसर्जन करावे.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग समिती क.3, कुपवाड श्रीगणेश उत्सव – २०२४ कुपवाड कार्यक्षेत्रातील विसर्जन व्यवस्था व मुर्तीदान केंद्र खालील प्रमाणे……

या ठिकाणी मुर्तिदान व विसर्जन करता येणार.

मिरज पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा म्हणाले की; गावांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव, ‘दणदणाटमुक्त’ मिरवणूक, समाजास ज्ञान प्रबोधन करणारे देखावे, महिला सक्षमीकरण, रक्तदान, वृक्षारोपण,सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्यात यावे असे गणेशमंडळांना, आवाहन करण्यात आले. जातीय सलोखा बिघडेल समाजात तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृत्य करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. तसे काय वाटल्यास पोलीसांची संपर्क साधून त्या गोष्टीची शहानिशा करावी.

गणेशोत्सव सण तसेच इतर सणाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ज्या नियम व अटी दिले आहेत त्यांचे पालन करून गणेशोत्सव सण साजरे करणारे अशा तीन आदर्श गणेशमंडळांना सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून बक्षीसे आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. कुपवाडमधून ‘आदर्श गणेशमंडळाचे’ एक बक्षीस कुपवाडतील गणेश मंडळाने मिळवावी असे प्रणील गिल्डा म्हणाले.

तसेच माघील वर्षी 2023 मध्ये पर्यावरण पूरक/पारंपारिक पद्धतीने मिरवणूक/शिस्तबद्ध देखावा/शासनाचे अटी शर्तीचे पालन करून ज्या मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. त्यांना कुपवाड पोलीसांच्या वतीने सन्मानपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आले आहेत.

मंडळांना सन्मानपत्र पोलीसांच्या वतीने देण्यात आले.

यावर्षी गणेशोत्सव पर्यावरणपूरक व ‘दणदणाटमुक्त’करण्याचे निर्धार सावळी,काननवाडी, मानमोडी या गावातील गणेश मंडळांनी घेतला आहे. सावळी गावातील मंडळांनी सी.सी कॅमेरा बसवण्याचे ठरविले आहे. अशी माहिती सावळीचे पोलीस पाटीलांनी दिली.

     पोलिसांसाठी एक कॅमेरा...
गणेशमंडळांनी गावामध्ये कॅमेरा बसवावे. कॅमेऱ्याची गरज आहे एखादी गावात वाईट किंवा चुकीची घटना घडली तर ती कॅमेरामुळे घटना कॅमेरामध्ये कैद होऊन घटना उघडकीस येण्यास मदत होते व सभोवताली घडणाऱ्या चुकीच्या घटनांवरही आळा बसतो. पोलिसांनाही त्या घटनेचा तपास लावून कारवाई करण्यास मदत होते.

पोलीस व प्रशासनाचे नियमांचे पालन करावे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button