सांगली:सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षकपदी बुधगावचे उमेश पाटील

उमेश पाटील यांचे मुळगाव बुधगाव आहे. पाटील हे मागील दोन वर्षे ते मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात होते. काही दिवसांपूर्वी बदलीचे आदेश निघाले होते.पाटील यांची मुबंईतून सांगलीत बदली करण्यात आली. पदभार स्विकारताच पाटील यांनी आवाहन केले की; कोणत्याही कार्यालयात शासकीय अधिकारी, कर्मचारी, खासगी व्यक्तीकडून लाच किंवा लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे निर्धास्तपणे तक्रार करावी.