
सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी परिपत्रकद्वारे सांगली विधानसभा न लढवण्याची भूमिका जाहीर केली आहे. सुधीर दादा गाडगीळ यांनी जाहीर केलेल्या या भूमिकेमुळे सांगलीतील भाजपाला व भाजपा कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
या परिपत्रकात म्हटलंय की; गेल्या दहा वर्षात पक्षाने दोनदा विधानसभा उमेदवारीची संधी दिली आता माझ्या ऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, असं माझं प्रामाणिक मत आहे. उमेदवारी मागणार नसलो तरी मी पक्षाचे काम यापुढेही करत राहणार आहे. पण आता मला विधानसभा उमेदवारी नको, अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केली आहे. राजकारणात कधी तरी थांबलं पाहिजे, पक्ष सामान्य कार्यकर्त्याच्या संघटनेतून बनला आहे. संघटनेची कार्यपद्धती प्रथम देश, नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी मी ” अशी आहे.
पक्षाने दोनदा विधानसभा उमेदवारीची संधी दिली आता माझ्या ऐवजी अन्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, असं माझं प्रामाणिक मत आहे. उमेदवारी मागणार नसलो तरी मी पक्षाचे काम यापुढेही करत राहणार आहे. माझ्यावर मतदारांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे प्रेम असेच कायम राहील असा विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल त्यांना विजयी करणे हाच माझा निर्धार असणार आहे.
माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीतले सर्वच प्रकल्प जे काही अपूर्ण करायचे राहिले असतील जरी मी निवडणुकीच्या राजकारणातनं थांबलो तरी ते प्रकल्प मी लवकरच पूर्णत्वास नेईन. मी निवडणुकीच्या राजकारणातून थांबतोय परंतु संघटनात्मक काम तसेच समाजकारण हे मी करतच राहणार आहे.