
बामणोली दत्तनगर रिक्षा स्टॉपचे रिक्षाचालक व स्वराज्य रिक्षा संघटनेचे सदस्य श्री मंगेश रसाळ यांची रिक्षा क्रमांक MH 10 CQ 1574 हे आपल्या कुटुंबा समवेत काही महिन्यापूर्वी देवदर्शनसाठी निघाले असता सांगलीवाडी येथील टोल नाक्यावर त्यांच्या रिक्षास समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्याने आपघात होता. अपघात इतका गंभीर होता की रिक्षाचे तर नुकसान झालेच होते परंतु त्यातील मंगेश यांच्या नातेवाईकांना सुद्धा जोराचा मार लागला होता.
अपघातानंतर मंगेशने स्थानिक रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष श्री अमोल हांडे यांना व स्वराज्य रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री रामभाऊ पाटील यांना झालेल्या अपघाताबाबत माहिती दिली. त्यानंतर रामभाऊ पाटील यांनी गाडीची सर्व कागदपत्रे वैद्य असल्यामुळे व ती स्वराज्य रिक्षा संघटनेकडे करून घेतल्यामुळे तसेच विशेष करून ‘इन्शुरन्स’ देखील संघटनेतून केल्यामुळे सदर गोष्टीचा श्री मंगेश रसाळ यांना नुकसान भरपाईसाठी इन्शुरन्स कंपनीकडे पाठपुरावा सुरू केला.

साधारण दोन ते तीन महिन्याच्या पाठपुराव्यानंतर श्री मंगेश रसाळ यांना रुपये रक्कम 55000 इतकी इन्शुरन्स कंपनी कडून रिक्षाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात आली.
इतके सर्व स्पष्ट सांगण्याच्या मागे हेतू इतकाच आहे की आपल्या लोकांचा काहीतरी गैरसमज आहे की रिक्षा चालकांना इन्शुरन्स मिळतच नाही. तसेच मार्केटमध्ये काही कमी दरात इन्शुरन्स उपलब्ध आहेत. परंतु स्वराज्य रिक्षा संघटना ही संघटनेच्या सभासदांकरिता 365 दिवस व दिवसाचे 24 तास काम करणारी संघटना आहे.
या संघटनेकडून सभासदा करिता अनेक योजना लागू केल्या आहेत यामध्ये खास करून अशा अपघाताच्या केसमध्ये सभासद असणाऱ्या रिक्षा चालकास अपघातानंतर नुकसान भरपाईसाठी जर कोर्टात दावा दाखल झाला तरी देखील आपली बाजू मांडण्याकरिता वकिलाची संपूर्ण जबाबदारी (एफिडेविट व स्टॅम्प फी वगळून) ही संघटनेची आहे. त्याचा संपूर्ण खर्च हा संघटना करते.
त्यामुळे शंभर, दोनशे रुपये वाचवायला जाऊन हजारो रुपयांचे भविष्यात नुकसान होऊ नये याची सर्व रिक्षा चालकांनी काळजी घ्यावी. स्वराज्य रिक्षा संघटनाचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री राम भाऊ पाटील यांच्या वतीने आवाहन करण्यात आले.
श्री मंगेश रसाळ यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी श्री रामभाऊ पाटील श्री अमोल हांडे, यांनी इन्शुरन्स कंपनीकडे सततचा पाठपुरावा करून मंगेशला नुकसान भरपाई मिळवून दिली.