
सांगली जिल्ह्यातील दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले . पतंगराव कदम यांनी महाराष्ट्रात अनेक खात्यांमध्ये मंत्रीपदे भूषवली होती. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्षे दायित्व केले. वांगी येथे पुतळा बसवण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप पक्षाला निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली की; छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळयाबाबाबत घडलेल्या घटनेबद्दल माफी मागताना फक्त महाराजांची माफी न मागता संपूर्ण महाराष्ट्रातिल व्यक्तींची माफी मागावी असे ते म्हणाले.व काँग्रेस अध्यक्ष मालिकार्जुन खर्गे यांनी म्हणाले की;आमचे सरकार आले तर लाडकी बहीण योजनांचे पंधराशे जागी दोन हजार देऊ.
राहुल गांधींनी वांगी येथील दिवंगत नेत्याला समर्पित संग्रहालयालाही भेट दिली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथला, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( सपा ) अध्यक्ष शरद पवार, कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.