मिरज तालुक्यातील अनेक गावांमध्ये मजूर सोसायटीवर काम टाकून टेंडर मॅनेज करणाऱ्या जिल्हा परिषदेतील अधिकारी अभिजीत पवार यांची चौकशी करण्याची मागणी.

मिरज तालुक्यातील अनेक गावांमध्ये एकाच मजूर सोसायटीवर अनेक कामे जिल्हा परिषदच्या काम वाटपात त्याच मजूर संस्थेचे नाव टेंडर मॅनेज करणाऱ्या जिल्हा परिषदेतील अभिजीत पवार नावाच्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.
मिरज तालुक्यातील अनेक कामे आठ आठ कामे एकाच मजूर सोसायटीवर आहेत. कोणाच्या आशीर्वादाने हे मॅनेज करण्याचे काम सुरू आहे अशा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने करण्यात आलेले आहे. आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे अधिकाऱ्यांना हाताशी धरून खटाव गावातील अनेक कामे मजूर सोसायटीच्या नावावर करण्यात आले आहे.
अशा जिल्हा परिषदेचे अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी केली आहे.
या प्रकरणांमध्ये दोषी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या आठ दिवसात या प्रकरणाची चौकशी समितीमार्फत तपासणी करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे येणाऱ्या आठ दिवसात या प्रकरणाची चौकशी होऊन कारवाई न केल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत हे आंदोलन करण्याच्या इशारा परशुराम बनसोडे यांनी दिला आहे.