खटाव (ता . मिरज ) येथे श्री.सोमेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यात श्रावणमास प्रवचन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेल्या पाच वर्षापासून श्री सोमेश्वर मंदिरामध्ये श्रावणमास महिन्यामध्ये शेवटच्या सोमवारच्या अगोदर पाच दिवस बेळंकीचे महाराज
श्री.ष.ब्र.108 गुरुशिवलिंग शिवाचार्य स्वामीजी यांचे प्रवचन ठेवून श्रावण सोहळा कार्यक्रम करण्यात येतो. यावर्षी सुद्धा श्रावण महिन्यात 28 ऑगस्ट पासून 2 सप्टेंबर पर्यंत प्रवचन आणि श्री सोमेश्वर देवास ‘रुद्राअभिषेकाचा कार्यक्रम’ करण्यात आला.

सलग पाच दिवस संध्याकाळी सदगुरू श्री शिवलिंग शिवाचार्य महास्वामी जी बेळंकी यांचे प्रवचन ठेवण्यात आले होते. दळवीवाडी येथील भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तसेच गावातील गुरुमाऊली हरिपाट महिला भजनी मंडळाचे शिवपाट ठेवण्यात आला होता. शेवटच्या सोमवारी दिनांक 2 सप्टेंबर श्री सोमेश्वर देवास रुद्राअभिषेक करण्यात आला. दररोज प्रवचना नंतर महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते. श्रावण सोहळा कार्यक्रमास मोठया संख्येने महिला व पुरुष सद भक्त मोठया संख्येने संतसंग मध्ये भाग घेतला होता.
श्रावण महिन्यात संतसंग करण्यात आल्यामुळे जेष्ठ व श्रेष्ठ नागरिकांकडून आयोजकांचे कौतुक होत होते .